The Post (2017)……. अमेरीकेची राजकीय समीकरण पत्रकारितेची ताकद दाखविणारी सत्य घटना

Share

सागर भोर

हा चित्रपट १९६६ च्या काळात चालू असलेल्या व्हिएतनाम युद्धावर आणि त्या निगडित सत्य घटनांवर आधारीत आहे. या काळात “Daniel एल्सबर्ग” हा अमेरिकी सैन्य तज्ञ (defence analyst) हा व्हिएतनाम दौऱ्यावर गेलेला असतो. त्याच काम सैन्य दलात चालू असलेल्या घडामोडी नोंदवून त्यावर रिपोर्ट बनवणं हे असतं. दौऱ्यावरून येताना तो डिफेन्स सेक्रेटरीच(रॉबर्ट McNamara) बोलणं ऐकतो आणि त्याच्या मते व्हिएतनाममध्ये अमेरिकेचा फक्त वेळ जातोय आणि हे युद्ध एक टाइमपास अस आहे. पण जेव्हा बाहेर येवून पत्रकार त्याला विचारतात तेव्हा सांगतो की सैन्य खूप चांगला काम करतय. एल्सबर्गला हे ऐकून आश्चर्य वाटते कारण अमेरिकी सैन्य खर तर खूप कठीण परिस्थिीतून जात असत. काही वर्ष जातात आणि एल्सबर्ग अमेरिकेच्या व्हिएतनाम मधील युद्ध आणि इतर हस्तक्षेप यावर असलेला एक confidential रिपोर्ट, जो हजारो पानाचा आहे, तो चोरतो आणि नील शिहान नावाच्या पत्रकराद्वरे The Newyork time या वृत्तपत्राला देतो. ही बातमी New York Times प्रसिद्ध करते.
१९७१, Washington Post, या वृत्तपत्राची मालकीण कॅथरीन ग्रॅहम ही आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर वृत्तपत्राची जबाबदारी आणि तीच सोशल लाईफ तयार करण्यात व्यस्त असते. याच कारण हेच की तिला या क्षेत्राचा काही अनुभव नसतो आणि आपल्या कंपनीच्या अमेरिका स्टॉक एक्सचेंज मध्ये नोंदणी साठी प्रयत्न करत असते. या मध्ये तिला तिचा मित्र आणि washington post चा संपादक “बेन ब्राडली” आणि “अर्थोर” मदत करत असतात. हा तो काळ असतो ज्या काळात तिचं वृत्तपत्र हे जास्त प्रसिद्ध नसतं आणि त्यामुळे आपण हा कारभार कसा उभारणार याच्या चिंतेत ती असते.
McNamara जो तिचा खूप जुना मित्र आहे तिला हे सांगतो की, माझ्या संदर्भातली एक बातमी new york times ने प्रसिद्ध केली आहे आणि जी खोटी आहे. तो तिला हे ही म्हणातो की तू अस काही करू नये कारण याचा परिणाम तुझ्या वृत्तपत्रांवर होईल. कोर्टाने अशा बातम्या देण्यावरून new york times ला bandi घातली आहे. त्याला अशी शंका असते की ही बातमी washington post नेच दिली आहे फक्त new York Times कडून.
“बेन ब्रॅडली” मात्र या घटनेची पूर्ण तपासणी करून ते जनते समोर आणायचं या मताचा असतो. या साठी तो एलसबर्ग ला गाठतो आणि सर्व डॉक्युमेंट्स मिळवतो. तो बेनला ते सर्व पुरावे देतो जे त्याने पूर्वी times ला दिले असतात. हे जेव्हा त्याच्या टीमला समजते तेव्हा त्याला सांगण्यात येते की अस केलं तर निक्सन गवर्नमेंट आपल्याला जेल मध्ये टाकेल. तो ग्रॅहम ल भेटून सांगतो की ही माहिती जनते समोर जाणं गरजेचं आहे आणि ते आपल काम आहे. ती मात्र नकार देते कारण तिचे McNamara शी चागले संबंध असतात. तिच्या वकिलाला हेही समजते की ही माहिती त्याच व्यक्तीकडून मिळाली आहे ज्याने ही times ला दिली होती. असे घडल्यास एकतर आपल्या बरोबर पूर्ण कंपनी मध्ये काम करत असलेल्या लोकांना जेल होवू शकते. परंतु बेन तिला हेही सांगतो की जर आपण कोर्टात ही केस जिंकलो तर आपल्या वृत्तपत्र खूप प्रसिद्ध होईल आणि हे आपल्यासाठी किती गरजेचं आहे. द्विधा मनस्थिती फसेलेली ग्रहेम तयार होते आणि ही बातमी Washington Post वृत्तपत्रात छपते.
टाइम्स आणि washington Post एकत्र येवून हे केस लढतात आणि जिंकतात. यां नंतर post च्या कोणत्याही पत्रकाराला white House मध्ये येण्यावर बंदी घातली जाते.
मित्रांनो, एका प्रगत देशाची ओळख ही अशा घटनांवरून ठरते. ही घटना एवढी मोठी आहे यामुळे त्या वेळचे अमेरिकी अध्यक्ष “रिचर्ड निक्सन” यांना राजीनामा द्यावा लागला.
स्टीव्हन स्पीलबर्ग याने बनविलेला हा सिनेमा अमेरिकी राजकारण आणि पत्रकारिता यावर भाष्य करणारा आहेच पण त्याहूनही एक इतिहास बदलिण्याची ताकद पत्रकारामध्ये असते हे सुद्धा दाखवणारा आहे.
नक्की पहा २०१७ मध्ये आलेला “The Post”