तुम्ही कधी विचार केला आहे, आपल्याला स्वप्न का आणि कशी पडत असतील?
विचार केला तर वर्षातील जवळपास 122 दिवस आपले झोपेत जातात. तुम्ही 75 वर्षाचे होईपर्यंत 25 वर्ष ही झोपेत गेलेली असतील असे research आपल्याला सांगतो. आपल्याला पडणारी स्वप्न ही खोटी नसतात हे तर तुम्हाला माहिती असेलच. झोपेत पडणारी स्वप्नं(Dreams) – आपल्या दैनंदिन दिवसातील एखादी अपूर्ण इच्छा असू शकते किंवा आपल्या मनातील भीतीचं काल्पनिक सत्य. आपण आपल्या रोजच्या झोपेतील 2 तास स्वप्नात घालवत असतो.
झोप आणि मेंदूचे कामकाज…
झोपेमुळे आपल्या शरीराला आराम मिळतो, परंतु झोपेतही आपला मेंदू सतत झोपेतही काम करत असतो. झोपे दरम्यान आपला मेंदू 5 वेग-वेगळ्या टप्प्यां मधून जात असतो. ह्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो REM STAGE(round eye movement). झोपेच्या ह्याच कालावधी मध्ये आपल्याला (dreams)स्वप्नं पडत असतात. REM म्हणजेच rapid eye movement जिथे आपल्या डोळ्याचे बुबुळ सतत गोल फिरत असते आणि आपला रेस्पिरेशन रेट हा सामान्य रेट पेक्षा अधिक असतो.

आपल्या स्वप्नात येणारी अनोळखी व्यक्ती कोण ?
आपल्या स्वप्नात येणारी माणसं ही अनोळखी नसतात, ती दिवसभरात आपल्या सोबत, आजूबाजूला फिरणारी असतात, ज्यांना कदाचित आपण नोटीस केलं नसेल परंतु आपल्या sub conscious mind मध्ये ती मेमरीच्या स्वरूपात स्टोअर झालेली असतात आणि हीच आपल्या स्वप्नांमध्ये अनोळखी म्हणून वावरत असतात.
Nightmare म्हणजे काय?
आपल्या पैकी बऱ्याच जणांना आपण एखाद्या जागी एकटेच असल्याची किंवा समुद्रात पाण्यात डुबतो आहे अशी स्वप्नं पडतात ज्यांना आपण दुःस्वप्न (nightmare) ही म्हणतो, आपल्याला पडणाऱ्या 40 स्वप्नांमागे एक nightmare येत असतो.
मग कायम पडणारी ही सर्व स्वप्नं चांगली आहेत की वाईट?
खरं तर ह्याचे उत्तर अजून संशोधनात आहे. आपल्याला अनेक वेळा पडणा-या अवघड प्रश्नांची उत्तरे स्वप्नात सुद्धा मिळू शकतात असा वैज्ञानिकांचा दावा आहे. रसायनशास्त्र(chemistry) मधील benzene ह्या कंपाऊंडच्या स्ट्रक्चरलचा शोध वैज्ञानिक ‘August kekule’ यांनी स्वप्नात असताना लावला होता, ज्याचे उत्तर त्यांनी कागदावर सकाळी उठताच लिहून ठेवले ह्या संशोधनाने केमिस्ट्री मध्ये नव्या वाटा खुल्या झाल्या.
Scientist Freud यांच्या ‘Dream- the interpretation of sub conscious mind’ या पुस्तकात Sigmund म्हणतात – “आपल्याला पडणारी स्वप्नं ही आपल्या भविष्याचा वेध घेत असतात व प्रत्यक्षात ज्या गोष्टी आपण करू शकत नाहीत त्या सर्व गोष्टी आपण स्वप्नात करण्याचा प्रयत्न करत असतो जे अगदी सुरक्षित वातावरणात धोकादायक परिस्थितीचा सराव करण्यासारखे आहे”.

पण आपल्याला स्वप्नं नक्की कशी पडत असतील?
या प्रश्नाचे उत्तर अद्याप उत्तम प्रकारे सापडलेले नाही. वैज्ञानिकांनी फक्त स्वप्नं पडण्याच्या शक्यता वर्तवल्या आहेत. या मागील खरे गुढ जाणून घेण्यासाठी आणि मेंदूचा अभ्यास करण्यासाठी तंत्रज्ञान दिवसेंदिवस विकसित होत आहे, त्यानंतरच आपल्याला, पडणाऱ्या स्वप्नांचे निश्चित कारण लक्षात येईल.
तोपर्यंत आपण स्वप्नं पाहत राहू!