sm logo new

The Untouchables ……दारू माफियाच्या अंताची एक अनोखी सत्य कथा

Share

Latest

मित्रांनो, तुम्हाला आश्र्चर्य वाटेल परंतु १९२० च्या दरम्यान अमेरिकी सरकारने अवैध दारू विक्री तसेच दारू बनविण्यावर बंदी आणली होती आणि त्याला prohibition असं म्हणलं गेल आहे. याच काळात झालेल्या एका खटल्याची ही सत्य कथा the Unstoppables.
१९३० मध्ये Al Capone या अवैध दारू विक्री करणाऱ्या बिझनेसमन ने संपूर्ण शिकागो शहर आपल्या हातात घेतले असते. त्याच्या या धंद्यावर बंदी आणि त्याचा शेवट करण्यासाठी एका ट्रेझरी डिपार्टमेंट मध्ये काम करणाऱ्या इलियट नेस या अधिकाऱ्यावर याची जबाबदारी दिली जाते. तो काम हाती घेताच Capone च्याच एका अड्ड्यावर छापा टाकतो. जेव्हा तो तिथे पोहोचतो तेव्हा त्याच्या हाती दारू सोडून रिकामे बॉक्सेस हाती लागतात आणि त्याचा प्लॅन फ्लॉप होतो. कारण capon ला याची खबर आधीच लागलेली असते. याच दरम्यान त्याची भेट एका Irrish American ऑफिसर, Jim melon, जो भ्रष्टाचाराला कंटाळून रिटायर झालेला आहे याच्याशी होते. तो त्याला सांगतो की तुला capon ला पकडायचे असेल तर तुला कोणत्याही थराला जावे लागेल. यासाठी दोघे जॉर्ज stone या अशा तरुण पोलिस ऑफिसर ची निवड करतात जो capon च्या नजरेत आलेला नाही. त्याच्या बरोबर एक accountant सुद्धा काम करणार असतो Oscar Wallac नावाचा. हे चार जण मिळून Capon च्या एका अड्यावर एक यशस्वी छापा टाकतात आणि ते एका रात्रीत प्रसिद्ध होतात. त्यांना the Unstoppables म्हणून ओळखलं जाऊ लागत.

wikipedia

दरम्यान Wallac ला समजते की Capone ने काही वर्षापासून इन्कम टॅक्स भरलेला नाही आणि हिं किंमत खूप मोठी आहे. तो सांगतो की आपण Capone ला या गुन्ह्यामध्ये अडकवू शकतो कारण Capone ला त्याची टीम बाकी गुन्ह्यामध्ये अडकवू देणार नाही कारण हा खूप हुशार गुन्हेगार आहे. याच दरम्यान Ness ला अनेक प्रकारे त्रास दिला जातो इतका की त्याला त्याच्या बायकोला आणि मुलीला अज्ञात ठिकाणी पाठवावे लागते. Frank Nitt हा Capone चा माणूस त्याला धमकीही देतो.
इकडे दुसऱ्या एका रेड मध्ये Ness, Capone ची दारू तर पकडतो पण त्याच्या एक अकाउंट पाहणाऱ्या माणसाला सुद्धा पकडतो. हा accountant सगळी मदत करायला तयार होतो. Wallac त्याला एका गुप्त ठिकाणी घेऊन जाणार असतो तर तितक्यात फ्रॅंक nitt तेथे येवून त्याचा आणि wallac चा खून करतो. Wallac चा खून झाल्याने Ness खूप अस्वस्थ होतो. पोलिस स्टेशन मध्ये येवून त्यांचा खून होतो यावरून त्याला Capone हा किती पोहोचलेला आहे हे कळतं.
इकडे Melone ला समजते की आतून एका पोलिसाने Capone ला ही बातमी दिली आहे आणि त्याला हा अधिकारीही माहीत असतो. Melone त्याच्याकडे जाऊन त्याला धमकी देऊन Capone च्या हेड accountant बद्दल विचारतो. Melone ला ही माहिती कळते आणि तो Stone आणि Ness ला त्याच्या घरी बोलवतो. ते तिकडे पोहोचणार असतात तर त्या आधीच Nitt त्यालाही मारून टाकतो. परंतु Melone ने हा हेड accountant कोणत्या ट्रेन ने जाणार आहे याचा पत्ता लिहून ठेवलेला असतो. तो पत्ता मिळताच Stone आणि Ness त्या स्टेशनला जातात आणि accountant ला पकडतात. हा Accountant Capone च्या विरोधात साक्ष द्यायला तयार होतो. कोर्टात जेव्हा त्याची साक्ष चालू असते तेव्हा Ness च्या लक्षात येते की Nitt हा gun घेऊन आलाय आणि तो त्याला बाहेर घेऊन जातो. तिथे Ness ला समजते की Nitt नेच त्याच्या दोन्ही साथीदारांना मारलं आहे. Nitt पळून जातो आणि Ness त्याच्या मागे जातो आणि त्याला मारून टाकतो.
इकडे कोर्टात Stone च्या हाती एक यादी लागते ज्यात Capone ने सगळ्या जुरी ला पैसे देऊन विकत घेतले असते. तो ती यादी Ness ला देतो. Ness ती यादी घेऊन चीफ जस्टिस कडे जातो. Chief justice सुद्धा विकला गेलेला असतो आणि तरीही Capone ला शेवटी अटक होते.
Capone ची अटक, रेल्वे स्टेशनचा तो गोळीबार अशा भन्नाट सीन ने भरलेली ही कथा आपल्याला २ तास खिळवून ठेवते. रॉबर्ट दे नेरो ची अक्टिंग बेभान करून टाकते.
१९८७ मध्ये आलेला हा (The Untouchables) सिनेमा आजही खूप लोकप्रिय आहे. सत्य घटनेवर असलेला हा सिनेमा नक्की पाहा Netflix वर.

FOR YOU