नेदरलँड मधील एक सोलर EV स्टार्टअप LIGHTYEAR ने जगातील पहिली सोलर कार लाँच केली आहे, ज्याचे नाव “lightyear-0” असे आहे. सहा वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर, सोलर कार जागतिक स्तरावर नावारूपास आली आहे.
9 जून रोजी online worldwide प्रीमियरमध्ये मध्ये Lightyear 0 चे अनावरण करण्यात आले. या प्रीमियरमध्ये, कंपनीने कारचे डिझाइन आणि कार मधील अनोखी वैशिष्ट्ये आणि त्यातील क्षमतांचे प्रदर्शन केले. Lightyear 0 ही सौरऊर्जेवर चालणारी जगातील पहिलीच कार आहे आणि म्हणूनच lightyear कडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.
LIGHTYEAR 0 कारची वैशिष्ट्ये…
ही कार 160 किमी (100 मैल) प्रति तास या वेगाने धावू शकते आणि फक्त 10 सेकंदात 100 किमी (62 मैल) प्रति तास वेगाने धावण्यासाठी lightyear सक्षम आहे.
Lightyear O 4-सीटर सौर-उर्जेवर चालणाऱ्या ईव्हीमध्ये सोलार बोनट आणि पाच चौरस मीटर double-curved solar arrays पॅनल आहे. . हे सौर पॅनेल कोणत्याही वेळी सूर्यापासून ऊर्जा घेऊ शकतात. हे तंत्रज्ञान प्रवास करताना किंवा बाहेर पार्क केलेले वाहन स्वतःला चार्ज करण्यास अनुकूल असेल. या पॅनल्सचा उपयोग करून कार दररोज अतिरिक्त 70km आणि प्रति वर्ष 11,000km पर्यंतची अधिक range देऊ शकते.
LIGHTYEAR 0 ला चार्जिंग कशी केली जाईल
Lightyear 0 ही पाच मीटर लांबीची इलेक्ट्रिक कार आहे, आणि तिचे एकूण वजन फक्त 1,575 Kg आहे. सोलर चार्जिंग वैशिष्ट्याव्यतिरिक्त, लाइटइयर 0 ला इतर रेगुलर इलेक्ट्रिक गाड्यांसारखे सुसज्ज चार्जिंग प्लग उपलब्ध करून दिलेले आहेत. पोर्तुगाल प्रमाणे मोठ्या प्रमाणात सूर्यप्रकाश असलेल्या देशांमध्ये कार पुन्हा चार्ज करण्यापूर्वी, सुमारे 35 किमी दररोज चालवल्यास सात महिन्यांपर्यंत चार्जिंग न करता वापरली जाऊ शकते. “नेदरलँड्ससारख्या ढगाळ हवामानात दररोज सुमारे 35 KMचा सरासरी प्रवास केल्यास चार्जिंग न करता दोन महिन्यांपर्यंत गाडी वापरली जाऊ शकते.
कंपनी पुढे दावा करते की LIGHTYEAR 0 हे जगातील सर्वात ऊर्जा-कार्यक्षम इलेक्ट्रिक वाहन आहे, जे प्रत्येक 100 KM साठी फक्त 10.5 kWh वीज वापरते.

पर्यावरणपूरक वाहन
या गाडीमध्ये वनस्पती-आधारित लेदर, मायक्रोफायबर, recycle केलेल्या बाटल्यांपासून बनवलेले कापड आणि 100% vegan इन्सुलेटेड पार्टिकल फोम वापरले गेले आहेत.
लाइटवर्ष 0 ची किंमत किती असेल?
लाइटइयर दरवर्षी फक्त 946 सौर उर्जेवर चालणारी वाहने तयार करण्याची योजना आखत आहे. Lightyear 0 Solar EV ची सुरुवातीची किंमत USD 263,243 किंवा अंदाजे रु 2.05 कोटी जाहीर करण्यात आली आहे.
LIGHTYEAR 0 कधी वितरित होईल?
2022 च्या शेवटच्या महिन्यांत संपूर्ण युरोपमधील रस्त्यावर सौर कार धावताना आल्या दिसतील. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या वर्षीची पहिली गाडी नोव्हेंबरमध्ये गाडीच्या ड्रायव्हर्सपर्यंत पोहचेल.