Time to kill (१९९६)…एका विदारक सत्याची काल्पनिक कथा!

Share


मित्रानो, हा सिनेमा एक कोर्टरूम क्राईम ड्रामा आहे जो जॉन ग्रिषम यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. अमेरिकेच्या blacks आणि व्हाईट भेदांची किनार असलेला हा सिनेमा सुरू होतो मिसिसिपी कँटन या शहरातून.
दोन “गोरे” लोक, बिली रे कोब आणि पीटर विलार्ड, एका दहा वर्षीय तोन्या या लहान आणि ब्लॅक मुलीवर अमानुष अत्याचार करून तिच्यावर बलात्कार करतात आणि तिला जवळच्या नदीत टाकून देतात. तोण्या यातून वाचते आणि पोलिस बिली आणि पीटरला अटक करतात.
आपल्या मुलीला न्याय मिळावा म्हणून कार्ल ली हीली, तोन्याचे वडील, कोर्टात जातात. त्यांना हे माहीत असतं की आपण रंगाने काळे आहोत आणि आपल्याला न्याय मिळणार नाही. तरीही तो आपली केस जेक ब्रिगेनस् कडे देतो जो खर तर रंगाने गोरा आहे पण त्याने कार्ल च्याच भावाला एका केस मध्ये न्याय दिलेला असतो. जेक हा तसा नवीन वकील आहे पण त्याला गोरे आणि काळे याढे भेदभाव करायला आवडत नाही आणि याच कारणाने कार्ल त्याला ही केस लढ्याला सांगतो.
आपल्याल न्याय मिळेल याची मनात शंका असताना तो जेकला विचारतो की यांना शिक्षा मिळेल का तर जेक सांगतो शिक्षा तर मिळेल पण ते नंतर सुटू शकतात. हे कळताच कार्ल ठरवतो की आपण आपल्या मुलीला न्याय द्यायचा आणि याच इराद्याने तो कोर्टात जातो, तिथे बिली आणि पीटर यांना पोलीस घेऊन चालले असता. कार्ल गोळीबार करून दोघांना मारून टाकतो. यात त्याच्या हातून एक पोलिस सुद्धा जखमी होतो.
सहाजिकच कार्लला अटक होते आणि पोलिस त्याला घेऊन जातात. जेक तिथे जातो आणि कार्ल ला वचन देतो की मी तुला काही झालं तरी वाचविणार. जेक हे प्रॉमिस करतो खरा पण घरी येऊन तो विचारात पडतो की मी हे करणार कसे?
एकीकडे एका ब्लॅक मुलीवर करण्यात आलेला बलात्कार आणि व्हाईट तरुणांचा खून यामुळे पूर्ण देश पेटून उठतो. सगळ्यांच लक्ष या केसवर आहे आणि सुरू होतो कोर्टरूम ड्रामा. District attorney रुफुस बकली ह्याने कार्ल ला फाशी द्यावी अशी अपील करतो. जेक ने हा खटला दुसऱ्या ठिकाणी व्हावा अशी अपील केलेली असते कारण त्या भागात सगळे व्हाइट्स राहत असतात परंतु कोर्टाचे जज ओमर नसिन फेटाळून लावत खटला ठरल्या ठिकाणीच होईल असे सांगतात. ह्या खटल्याचा निर्णय त्या भागातले नमांकित लोक करणार होते ज्यांना “ज्यूरी” म्हणतात.
जेकची एक टीम असते ज्यात त्याची स्टूडेंट एलेन आणि मित्र हॅरी बरोबर लुसिन वेलबांग जो एक खूप मोठा activist आणि मोठं वकील सुद्धा आहे. लुसीन जेक चा सल्लागार सुद्धा आहे. इकडे बलात्कारी दोषी मध्ये असलेल्या एकाच्या भावाने एक व्हाईट्सचा ग्रुप जॉईन केला आहे तो Black’s च्या विरोधात काम करत असतो. ह्या ग्रुप ची मागणी असते की कार्लला फाशी व्हावी. पुढे जाऊन त्यांचा उपद्रव एवढा वाढतो की ते Black’s लोकांना मारायला आणि त्यांची घर जाळायला सुरुवात करतात. त्यांनी कार्लला support करणाऱ्या व्हाईट्स ला पण मारायला सुरुवात केलेली असते. हा वाद एवढा पुढे जातो की खूप लोक जखमी होतात. ते जेक वर पण अटॅक करतात आणि त्याचं घर जाळून टाकतात. त्याची सेक्रेटरीला सुद्धा मारण्याचा प्रयत्न होतो, त्यात तिचा नवरा मरण पावतो. ते एलेनेला सुद्धा मारहाण करतात. याचा जेकवर सुद्धा परिणाम होतो आणि तो कार्ल ला सांगतो की आता तुला वाचवणं अवघड आहे. त्यावर कार्ल त्याला सांगतो की मी तुला निवडला कारण तू एक व्हाइट आहेस. आपल्याबरोबर लोकांची भावना आहे.
हा मुद्दा आता एक केस नसून ब्लॅक आणि व्हाइट यांच्या संघर्षावर येऊन पोहोचला. विरोधी वकील कोर्टात म्हणतो की, कार्ल ने एक खून केला आहे आणि तोही कोर्टात ज्यामुळे त्याला फाशी दिली गेली पाहिजे. जज जेकला closing स्टेटमेंट द्यायला सांगतात त्यावर जेक ज्युरीला डोळे बंद करायला विनंती करतो आणि म्हणतो, “तुम्ही आता थोडे वेळ डोळे बंद ठेवा आणि मी तुम्हाला एक खरी घटना सगंतो आहे ती डोळ्यासमोर आणा. एका दहा वर्षाच्या ब्लॅक मुलीवर बलात्कार होतो. तिला मारण्यासाठी ते दोहे तिला झाडाला लटकावतात, ती मरत नाही हे पाहतच ते तिला नदी मध्ये ढकलून देतात. पण तिचं नशीब पहा ती तेव्हाही वाचली. तुम्ही एकदा विचार करा की एका दहा वर्षीय मुलीवर याचा काय परिणाम झाला असेल. आता दोन मिनिटे असा विचार करा की ती ब्लॅक नसून व्हाइट आहे आणि हे सगळं तिच्या बाबतीत होतंय. मी हे मान्य करतो की कार्लने हे करायला नको होतं. पण तो एक ब्लॅक आहे. आपण या लोकांना कधी न्याय मिळू दिला नाही. त्यांना समान लेखत नाही. त्यांना त्रास देतो, त्यांच्या आयुष्यात लक्ष देतो पण ते काहीच करू शकत नाही. आपण जर त्यांना समान मानलं असतं तर कार्ल ने असं केलं असतं का?”
कोर्टात आणि बाहेर सगळे लोक जमा झालेले असतात. ते कार्लला न्याय मिळावा म्हणून घोषणा देत असतात आणि कोर्टाचा निकाल लागतो.
मित्रांनो हा सिनेमा फक्त एक काल्पनिक कथा नाहीये तर एक सत्य आहे. अमेरिेकासारख्या देशात वर्णद्वेष हा प्रचंड आहे आणि त्यावर भाष्य करताना हा सिनेमा आपल्याला विचारत पाडतो. शेवटचे दहा मिनिटं हा सिनेमा खूप काही शिकवून जातो.
नक्की पहा time to kill youtube किंवा MN+ या चॅनल वर.