sm logo new

दुग्ध व्यवसाय व उत्पादन वाढीसाठी अत्याधुनिक VR Technology (Virtual Reality) चा वापर…

Milk_products_business_social_mirror
Milk_products_business_social_mirror

Share

Latest

दुग्ध व्यवसाय म्हणजे काय ?

गाई, म्हशी, शेळ्या व यांसारखे इतर दूध देणारे पाळीव प्राण्यांचे पालनपोषण करून त्यांच्या पासून मिळणाऱ्या दुधाचा वापर करून शेतीस जोडधंदा करुन आपल्या करता एक उत्पन्नाचा स्रोत तयार करणे .
शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्त्वाचा व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई,देशी गाई , गावठी दुधाळ गाई आणि दुधाळ म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने (eg. VR Technology) व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो व त्यात चांगली मिळकत होते.

VR(virtual reality) तंत्रज्ञान म्हणजे काय ?

आपल्याला ५ ज्ञानेंद्रिये (sensory organs) असतात. त्यात १. जीभ २. नाक ३. डोळे ४. कान ५. त्वचा यांचा समावेश असतो. या ५ sensory organs पैकी डोळे हे सर्वात महत्वाचे समजले जातात. एका रिसर्च द्वारे असे समोर आले आहे कि आपण जे डोळ्यांनी बघतो त्याचा परिणाम मेंदूवर होतो तसेच मेंदू द्वारे आपल्या पूर्ण शरीरावरही त्याचा परिणाम होतो. याचाच संदर्भ घेऊन एक असे तंत्रज्ञान बनवण्यात आले ज्याचा उपयोग करून आपण आभासी दूनियेमध्ये खराखुरा आभास निर्माण करू शकतो. यासाठी VR तंत्रज्ञानाचा वापर करतो आहे. VR म्हणजे Virtual Reality. यामध्ये एक बॉक्स सारखे दिसणारे उपकरण आपल्या डोळ्यांवर लावले जाते व ऐकण्यासाठी headphones वापरले जातात. आपल्या डोळ्यांसमोरील यंत्रणात आपल्याला हवे ते दृश्य दाखवले जाते व डोळ्यासमोरील दृष्या मध्ये जे दिसते त्यावर आपला मेंदू कल्पना करून आपले सम्पूर्ण शरीर त्या दृश्यामध्ये दिसणाऱ्या जागेवर खरोखर आहे असा आभास तयार होतो.
थोडक्यात सांगायचे झाले तर VR चा वापर करून जर आपण हिमालयातील दृश्य बघत असू तर आपण स्वतः तिथं हिमालयात आहोत व हिमवर्षाव बघण्याचा आनंद घेत आहोत असे वाटेल.दुग्ध व्यवसायामध्ये गाई व म्हशी मध्ये दुग्ध निर्मिती होण्यासाठी पोषक आहार खूप महत्वाचा असतो परंतु याच बरोबर महत्वाचे असते त्यांच्या आजू-बाजूला असणारी हिरवळ आणि पोषक वातावरण.

virtual_digital_business_social_mirror
Value-Added Milk Products

अभ्यासामधून असे दिसून आले आहे – “ज्या गाई मोकळ्या वातावरणात वावरतात व ज्यांच्या डोळ्यासमोर कायम हिरवीगार वनराई असते, तसेच ज्या गाई हिरवीगार चारा ग्रहण करत असतात त्या गाई, म्हशी ह्या गोठ्यात असणाऱ्या जनावरांपेक्षा जास्त दूध देतात.” जास्त दूध म्हणजेच जास्त उत्पादन! या सर्व गोष्टींचा विचार करून रशिया मधील काही दुग्ध व्यावसायिकांनी VR तंत्रज्ञान चा वापर दूध व्यवसायात करुन पहायचे ठरवले, प्रयोगात त्यांना जनावरांच्या दूुधामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले.

VR तंत्रज्ञानाचा गाई व म्हशींकरता वापर…

हे तंत्रज्ञान वापरात असताना, लागणार VR बॉक्स गाई, म्हशींच्या डोळ्यांच्या व चेहऱ्याच्या रचने नुसार बनवावे लागते, यासाठी रशियातील काही शास्त्रज्ञांनी व दुग्ध व्यावसायिकांनी मिळून अभ्यास करून अपेक्षित आकाराचे VR बॉक्स बनवले व त्याची चाचणी काही ठराविक गाईंवर घेण्यात आली, ज्यात हे VR बॉक्स गाईंच्या डोळ्याला लावले गेले व त्यात गाईंना हिरवे मैदान दाखवले गेले सोबत त्यात पशु-पक्षी आणि आनंदी वातावरण दाखवले गेले , यामुळे असे दिसून आले की ज्या गाईंना VR लावले होते त्या गाईंनी इतर गाईंपेक्षा जास्त दूध दिले होते.

VR तंत्रज्ञान ची दूध वाढीसाठी कशी मदत होते ?
VR यंत्र हे गाईच्या डोळ्यांवर लावले जाते व त्यात हिरव्या मैदानाचे व आनंदी वाटणारे दृश्य दाखवले जातात, जेव्हा ते दृश्य दाखवले जातात तेव्हाच काही पशु पक्ष्यांचे आवाज देखील ऐकवले जातात. त्याचा परिणाम गाईंच्या विचार क्षमतेवर होतो व गाय असे समजू लागते की ती स्वतः त्या मैदानावर फिरत आहे , चरत आहे व गाईला हे सर्व दृश्य आनंदित करतात व ज्यामुळे गाय तणाव मुक्त होऊन जाते , त्यामुळे गाईच्या शरीरात
दूध निर्मितीसाठी आवश्यक harmones तयार होतात जे गाईंच्या दूध उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करतात, आभासी स्वरूपात गाय ही हिरव्या मैदानात आहे असे वाटत असते त्यामुळे गाईचे सर्वांगीण आरोग्य देखील चांगले राहते. रशिया मध्ये काही दुग्ध व्यवसायिक या तंत्रज्ञानाचा वापर करत आता प्रत्यक्ष करत आहेत .

VR चा वापर करणे चांगले की वाईट ?
VR चा वापर करणे हे चांगले आहे की वाईट या बद्दल सध्या तरी काही सांगू शकत नाही कारण सगळीकडे ते अजून तरी वापरले जात नाही. परंतु जर त्याचा वापर करणे हे शास्त्रीय दृष्ट्या बरोबर असले तर याचा येणाऱ्या काळात दुग्ध व्यावसायिकांना खूप फायदा होईल हे नक्की.

FOR YOU