sm logo new

काय आहे विधानपरिषद?

Share

Latest

नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा आणि विधानपरिषेतील सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आपल्या सगळ्यांना विधानसभा आमदार माहिती असतातच कारण तेच प्रसिद्ध लोकनेते देखील असतात. परंतु, विधानपरिषद आमदार माहिती बाबतीत काहीसा गोंधळ उडतो.

विधानसभा थोडक्यात

राज्य विधिमंळात ‘विधानसभा’ आणि ‘विधानपरिषद’ अशी दोन सभागृहे असतात.
विधानसभा म्हणजे मतदारांनी सार्वजनिक निवडणुकीत मतदान करून निवडून दिलेले प्रतिनिधी ज्या सभागृहात बसून राज्यकारभार सांभाळतात ते सभागृह होय.
महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण २८८ आमदार आहेत. भारतामध्ये सर्वाधिक आमदार यादीत उत्तर प्रदेश (४०३), पश्चिम बंगाल (२९४) या राज्यांनंतर महाराष्ट्राचा (२८८) तिसरा क्रमांक लागतो.

विधानपरिषद म्हणजे काय?

विधानपरिषद बाबतीत हे थोडंसं वेगळं आहे कारण विधानपरिषद सदस्य हे मतदार (मतदान करून) निवडून देत नाहीत तर ते ‘प्रमाणशीर प्रतिनिधित्व एकल संक्रमणीय मतदान’ (PRSTV) पद्धतीने आमदारांनी मतदान करून अप्रत्यक्षरित्या निवडलेले असतात.

विधानपरिषदेचा कालावधी ६ वर्षे इतका असतो. दर २ वर्षांनी विधानपरिषद मधील १/३ (एक तृतीयांश) सदस्य पदच्युती होते आणि तितकेच सदस्य निवडले जातात. यामुळेच या सभागृहाला ‘स्थायी सभागृह’ म्हटले जाते.

कोणत्या राज्यांमध्ये विधानपरिषद आहे?
भारतात केवळ ६ राज्यांमध्ये विधानपरिषद आहे.
१. उत्तर प्रदेश (१०० आमदार)
२. महाराष्ट्र (७८ आमदार)
३. बिहार (७५ आमदार)
४. कर्नाटक (७५ आमदार)
५. आंध्र प्रदेश (५८ आमदार)
६. तेलंगणा (४० आमदार)

विधानपरिषद (सदस्य) रचना :

विधानपरिषद सदस्य संख्या कमीत कमी ४० असते. मात्र त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या १/३ पेक्षा जास्त नसते.
जसे, महाराष्ट्र विधानपरिषदेत ७८ आमदार आहेत.
या ७८ आमदरांपैकी,
१/३ सदस्य – नगरपालिका, जिल्हाबोर्ड या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडले जातात.
१/३ सदस्य – विधानसभा सदस्य मधून निवडले जातात.
१/१२ सदस्य – पदवीधर मतदासंघातील असतात.
१/१२ सदस्य – शिक्षक मतदारसंघामधून निवडले जातात.
१/६ सदस्य – साहित्य, विज्ञान, कला, सहकारी चळवळ, समाजसेवा यातील विशेष ज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभव असणाऱ्या व्यक्तींना राज्यपाल नामनिर्देशित करतो (राज्यपालांनी निवडलेल्या या १/६ सदस्यांच्या निवडीबाबत न्यायालयात दाद मागता येत नाही.)

विधानपरिषद निवडणूक लढविण्यासाठी पात्रता :

वय – किमान ३० वर्षे
वेळोवेळी केलेल्या कायद्यानुसार सदस्य अपात्र ठरू नये.
मतदार असणे गरजेचे.

अनामत रक्कम (deposit) :

विधानपरिषद निवडणूक लढविण्यासाठी ₹१०,०००/- अनामत रक्कम (deposit) भरावी लागते. निवडणुकीमध्ये एकूण मतांच्या १/६ मते मिळाली नाहीत तर ही रक्कम निवडणूक आयोग जप्त करतो.
‘भारतीय नाणे कायदा, २०११’ अनुसार ही रक्कम coins अथवा नाण्यामध्ये भरता येत नाही.

विधानपरिषद गरज का?

१. तज्ञ व्यक्तींची ही सभा असते.
२. पवित्रता आणि प्रतिबिंब दर्शविणारे हे सभागृह असते.
३. येथे होणारी सर्व चर्चासत्रे गुणात्मक मानली जातात.
४. विधानसभेतील आमदार जनतेच्या दृष्टिकोनातून तर विधानपरिषदेतील आमदार तज्ञतेच्या परिप्रेक्ष्यात प्रश्नाकडे बघतात यामुळे निर्णप्रक्रियेत समतोल साधता येतो.

FOR YOU