sm logo new

काय आहे ७२५१ एकर च्या Apple Headquarters Apple Park मध्ये ? | Inside the Apple Park

apple_headquarter_social_mirror
apple_headquarter_social_mirror

Share

Latest

“मोबाईल क्षेत्रात जगामध्ये प्रथम क्रमांकावर असणा-या ॲपल कंपनीने 2022 मध्ये iPhone 13 ही series नुकतीच लाँच केली. Iphone13 बाजारात येण्यापूर्वी iPhone लाँच झाल्यानंतर 2 ते 3 आठवड्यानंतरच तो भारतीय बाजारपेठेत मध्ये उपलब्ध व्हायचा. परंतु ह्या वेळी मात्र ॲपलने जगातील इतर 30 देशांप्रमाणे iPhone 13 हा जगाबरोबर भारतामध्ये ही एकाच वेळी लाँच केला. ज्यामुळे भारतीयांना सुद्धा iPhone 13 series pre book करता आली.
टेक्नॉलॉजी मध्ये जगाच्या एक पाऊल पुढे चालणारा ब्रँड म्हणून ओळख असणारा Apple ज्याप्रमाणे आपल्या iphonesसाठी ओळखला जातो त्याचप्रमाणे, हा जगप्रसिद्ध ब्रँड आपल्या मुख्यालयासाठीही विख्यात आहे. ‘Cupertino’, California येथील Apple headquarters एकूण 5 billon dollar चे आहे.ज्याचा समावेश जगातील सर्वात महागड्या इमारतीं मध्ये केला जातो. ‘Apple park‘ म्हणुन ओळख असलेले हे headquarter IT वर्कर्ससाठी एक प्रकारे ‘American dreams’ आहे.

Unsplash

Apple park मागील संकल्पना…


2006 मध्ये ॲपल कंपनीचे संस्थापक Steve job यांनी, या पार्कचे design स्वतः बनवले. परंतु ॲपल पार्कचे कन्स्ट्रक्शन मुळात 2013 मध्ये सुरू होऊन 2017 मध्ये पूर्ण झाले. या ऍपल पार्कचे क्षेत्रफळ एकूण 176 एकर आहे, त्यातील सुमारे 80 टक्के क्षेत्र ग्रीनस्पेस म्हणजेच गार्डनसाठी वापरली गेली आहे आणि अॅक्च्युअल वर्कस्पेस ही बाह्य रिंग आकाराची इमारत आहे, जी या हिरव्या क्षेत्राला व्यापते. या रिंग शेप वर्कस्पेस इमारतीचा संपूर्ण वरचा भाग सौर पॅनेलने झाकलेला आहे जो या ऍपल पार्कची सुमारे 75 टक्के उर्जेची आवश्यकता पूर्ण करतो. अॅपल पार्क हे पूर्णतः भूकंप प्रतिरोधक देखील आहे आणि एका वेळी 12,000 कर्मचार्‍यांच्या आसनक्षमतेसह सुमारे 1 मैलांचा घेर व्यापणारी ही इमारत आहे. पार्कमध्ये कर्मचारी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरू शकतात किंवा कॅम्पस बसने जाऊ शकतात, यासाठी येथे बाइक्स देखील उपलब्ध केल्या गेलेल्या आहेत.Apple पार्क मध्ये भूमिगत रस्ते बनवलेले आहे ज्यामुळे कर्मचारी दृश्यास अडथळा न आणता इमारतीच्या आत-बाहेर ये-जा करू शकतात.
अॅपल पार्क मध्ये काम करणाऱ्या कर्मचार्‍यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि जास्तीत जास्त innovationsला चालना देणारे अत्याधुनिक डिझाईन्स आपल्या येत असल्याचे आढळून येते. यासाठी अनेक पावले उचलली गेली ज्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘काचेच्या भिंती‘. Apple ने पारंपारिक ऑफिस क्युब्जशी तुलना करून आपल्या ऑफिसेससाठी एक वेगळा दृष्टीकोन ठेवला. पारंपारिक कार्यालयांमध्ये कर्मचार्‍यांना बसण्यासाठी आणि काम करण्यासाठी एक लहान डेस्क असतो. ऍपल पार्कमध्ये कल्पनांच्या मुक्त प्रवाहासाठी मोकळी जागा उपलब्ध आहे जेणेकरून कर्मचार्‍यांना एकत्र येणे शक्य होईल त्यांच्यातील संवाद वाढेल आणि त्यांना कंटाळाही येणार नाही.

Unsplash

ऍपल पार्क मधील काही मुख्य बाबी-

1.ऍपल गार्डन
ऍपल पार्कच्या मध्यवर्ती भागात ग्रीन गार्डन आहे. ज्यामध्ये सुमारे 9000 भिन्न जातीची झाडे व काही ऑर्किड्स लावली गेलेली आहेत. यात प्रामुख्याने स्ट्रॉबेरी, अवाकर्दो आणि सफरचंद या सारख्या झाडांचा समावेश होतो. अभ्यासातून असे दिसून आले आहे की हिरवीगार वनस्पती तणाव कमी करण्यासाठी आणि नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देण्यासाठी असरदार ठरतात आणि ऍपल या नैसर्गिक औषधाचा पूर्णपणे वापर करत आहे.

रिंगमध्ये ‘Caffe Macs’ हे एकमेव 58,000 स्क्वेअर-फूटचे रेस्टॉरंट आहे जेथे कर्मचार्‍यांना विश्रांतीच्या वेळेत एकत्रित होता येईल. रेस्टॉरंटमध्ये आपल्याला ऍपल पेटंट पिझ्झा बॉक्स देखील पहावयास मिळतो जो पिझ्झा क्रस्टला ओलसर होण्यापासून रोखतो. या caffe Macsची शमता एका वेळी 15,000 लोक एकसाथ जेवतील इतक्या पुरेश्या अन्नाची आहे.

2.इको-फ्रेंडली मीट्स लाइफस्टाइल –
ऍपल आपल्या पार्क मधील पार्कमधील 12,000 कर्मचाऱ्यांना निरोगी जीवनशैली जगण्यासाठी प्रोत्साहित करते. ऍपल पार्कच्या मैदानावर 3.2 किलोमीटर चालण्याचे आणि धावण्याचा मार्ग उपलब्ध आहे. ह्या वेतिरिक्त सुविधांमध्ये जिम, वेलनेस सेंटर, बास्केटबॉल आणि टेनिस कोर्ट यांचाही समावेश होतो. ऍपलचे 100,000 स्क्वेअर फूट फिटनेस आणि वेलनेस सेंटर, चेंजिंग रूम, लॉन्ड्री सेवा, टीम वर्कआउट रूम आणि दोन मजली योगा स्टुडिओ आहे. ऍपल पार्कमधील सर्व इमारती अतिशय पर्यावरणपूरक आहेत हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

Tim Cook/Apple

3.भूमिगत थेटर-
जमिनीच्या खाली तुम्हाला स्टीव्ह जॉब्स थिएटर आहे. या 1,000 आसनांच्या सभागृहात जाण्यासाठी तुम्ही 42 फूट लांब अशी, रासायनिक टेम्पर्ड ग्लास लिफ्ट वापरू शकता. ही लिफ्ट पृथ्वीवरील सर्वात मोठी फ्री स्टँडिंग ग्लास लिफ्ट मानली जाते. येथे रिंगच्या खाली बेस आयसोलेशनचा वापर केला आहे. बेस आयसोलेशन 692 स्टेनलेस स्टील प्लेट्सने बनलेले असल्यामुळे हे ऍपल रिंगचे भूकंपांपासून संरक्षण करते.

4-बाकी कॅम्पस
आत रिंगपासून दूर जात असताना, दोन मुख्य इमारती आहेत यामध्ये संशोधन आणि विकास सुविधा क्लिनिक आणि व्हिजिटर्स सेंटर येते – कॅम्पसमधील व्हिजिटर्सला पासशिवाय प्रवेश करता येणारी ही एकमेव इमारत आहे.
व्हिजिटर्स सेंटर हे एकाच छताखाली आहे परंतु यात आपल्याला प्रामुख्याने 4 स्वतंत्र विभागांचा समावेश असल्याचे दिसून येते. एक – 10,000 चौरस फूट Apple Store, २,००० चौरस फूट कॅफे, एक observation desk आणि ऍपल पार्कची virtual टूर करण्यासाठी VR experience area आहे
Apple मधील सर्क्युलार पार्कच्या मध्यभागी तुम्हाला इंद्रधनुष्याचे स्ट्रक्चर दिसून येईल. जो अॅपलचा ओरिजनल logoचा रंग आहे. या स्ट्रक्चरचा वापर बहुतेक वेळा कलाकारांसाठी स्टेज म्हणून केला जाते.
या सर्व गोष्टी लक्षात घेत अनेक एक्सपर्टच्या मतानुसार Apple पार्क हे आतापर्यंतचे सर्वात नेत्रदीपक मुख्यालय आहे जे संभाव्य कर्मचारी आणि मीडिया दोघांनाही नक्कीच आकर्षित करते.

FOR YOU